Sangamner : कॅन्सर बरा करण्याचा दावा; संगमनेरच्या ‘गडगे महाराज’ विरोधात अंनिस आक्रमक

Sangamner : कॅन्सर बरा करण्याचा दावा; संगमनेरच्या ‘गडगे महाराज’ विरोधात अंनिस आक्रमक

0
Sangamner : कॅन्सर बरा करण्याचा दावा; संगमनेरच्या ‘गडगे महाराज’ विरोधात अंनिस आक्रमक
Sangamner : कॅन्सर बरा करण्याचा दावा; संगमनेरच्या ‘गडगे महाराज’ विरोधात अंनिस आक्रमक

Sangamner : नगर : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून ‘भोंदुगिरी’ प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने आश्रम चालवणारे राजेंद्र गडगे (स्वयंघोषित महाराज) यांच्या कार्यपद्धतीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : ६०० शिक्षकांची बनावट भरती; कोट्यवधींचा पगार परस्पर लाटला

काय आहे दावा? (Sangamner)

राजेंद्र गडगे हे आपल्या आश्रमात ‘दरबार’ भरवून भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. विशेषतः वैदिक पद्धती, ध्यानसाधना आणि मनाची ‘संकल्पशक्ती’ वाढवून कॅन्सरसारखे गंभीर आजारही बरे होऊ शकतात, असा दावा त्यांनी केल्याची चर्चा आहे. याच दाव्यामुळे अंनिसने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये पुन्हा तमाशा कलावंतांवर हल्ले

अनिस आक्रमक (Sangamner)

अंनिसच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांचा आरोप आहे की, हा चमत्काराचा प्रकार नसून भक्तांचे आर्थिक आणि मानसिक शोषण आहे. कॅन्सरसारख्या आजारावर उपचाराच्या नावाखाली दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाने तातडीने फौजदारी गुन्हे नोंदवून आश्रमावर कारवाई करावी. तर राजेंद्र गडगे यांनी भूमिका मांडताना म्हंटलंय की, “मी भोंदू नाही, माझी तुलना अशोक खरातशी करू नका. गेल्या ३८ वर्षांपासून वडिलोपार्जित जागेत सेवा देत असून मी कोणताही चमत्कार करत नाही. तेथे असलेले मेडिकल स्टोअर आणि माझा थेट संबंध नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे.”

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आता प्रशासन या दाव्यांची सत्यता तपासणार का आणि ‘जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत’ कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.