Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा : शहरातील रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या (Administration) उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी बुधवार (ता .१५) श्रीगोंदा नगरपालिकेच्या (Shrigonda Municipal Council) प्रवेशद्वारावर सतीश बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली ‘ठिय्या आंदोलन’ (Protest) करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे नगरपरिषद परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे, शिंदे गटातील नगरसेवकांनी या ठिय्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन
योग्य प्रतिसाद मिळत नाही
लोकप्रतिनिधींनीच प्रशासनाविरोधात भूमिका घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषदेकडे वारंवार माहिती मागूनही योग्य प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जाते, परंतु प्रत्यक्षात कामे शून्य आहेत. “प्रशासनाच्या टाळाटाळ करण्याच्या वृत्तीमुळेच आज आम्हाला रस्त्यावर उतरून ठिय्या मांडण्याची वेळ आली आहे,” असे सतीश बोरुडे यांनी बोलताना सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी (Shrigonda Municipal Council)
आंदोलकांनी प्रशासनासमोर शनि चौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता या मुख्य रस्त्यावरील गटर लाईन आणि रस्त्याचे काम दीर्घकाळापासून रखडलेले आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणावर धूळ आणि कचरा साचला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्य धोक्यात आले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभांमध्ये नेमके काय निर्णय होतात, हे सामान्य जनतेला कळावे यासाठी सभांचे फेसबुक/यूट्यूबवर थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.
इमारतींचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक
सरस्वती नदी परिसराची स्वच्छता आणि बायपास रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा विनियोग करून इमारतींचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करून एक शिस्तबद्ध व्यवस्था लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वरील मागण्यांवर लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर हे ठिय्या आंदोलन अधिक आक्रमक आणि तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून, आता मुख्यधिकारी यावर काय तोडगा काढतात, याकडे लक्ष लागले आहे.



