Theft : सांगवीत चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत चार घरफोड्या

Theft : सांगवीत चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत चार घरफोड्या

0
Theft : सांगवीत चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत चार घरफोड्या
Theft : सांगवीत चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत चार घरफोड्या

Theft : पाथर्डी : तालुक्यातील सांगवी (Sangvi) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सलग घरफोड्यांच्या (Theft) घटना घडवल्या आहेत. अवघ्या १५ दिवसांत चार ठिकाणी घरफोड्या होऊन सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी (Thieves) लंपास केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन

सोन्याची अंगठी चोरीला

ताज्या घटनेत (ता. १४) एप्रिलच्या रात्री सांगवी येथील लहु भानुदास हाडके (वय ५२) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली.  हाडके हे रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबासह घरासमोरील पडवीत झोपले होते. पहाटे सहाच्या सुमारास उठल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसून आला. घरात पाहणी केली असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसून आली. तपासणीदरम्यान ५६ हजार रुपये रोख व २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचे उघड झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी (Theft)

याच रात्री शेजारी राहणाऱ्या सुलोचना गणपत हाडके यांच्या घरातही चोरी झाली. त्यांच्या घरातून ७ हजार रुपये रोख तसेच सुमारे ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार व मणी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दोन घटनांमध्ये एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यापूर्वीही सांगवी परिसरात सुधाकर मुरलीधर हाडके यांच्या घरातून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने, तर कानिफ भगवान हाडके यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने व ५ हजार रुपये रोख चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची भेट घेऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. 

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी जनार्धन गालपगारे, संदीप लोखंडे, अंकुशराव हाडके, दासाहेब हाडके, संदीप हाडके, विनायक गोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत बीट अमलदार भाऊसाहेब खेडकर यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असून परिसरात रात्री गस्त वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले. तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या घटनांमुळे सांगवी परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी रात्री सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.