Dadapatil Rajale College : राजळे महाविद्यालयात करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Dadapatil Rajale College : राजळे महाविद्यालयात करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

0
Dadapatil Rajale College : राजळे महाविद्यालयात करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
Dadapatil Rajale College : राजळे महाविद्यालयात करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Dadapatil Rajale College : पाथर्डी : तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात (Dadapatil Rajale College) आयोजित माजी विद्यार्थी मेळावा स्पर्धा परीक्षा (Competitive Exams) व उद्योजकता या विषयांवरील मार्गदर्शनाने संपन्न झाला. आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला आजी -माजी  विद्यार्थी उपस्थित झाले होते.

नक्की वाचा : मोनिका राजळे यांचा नागरिकांशी संवाद; भाजपा महायुतीला साथ देण्याचे आवाहन

आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा भाग

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या तयारीत नियोजन, सातत्य आणि आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वास अवश्यक असतो.अभ्यासाचे दीर्घकालीन नियोजन कसे करावे.दररोज थोडे-थोडे पण सातत्याने अभ्यास करणारा विद्यार्थीच शेवटी मोठे यश मिळवतो. स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे अपयश हे शेवट नसून पुढच्या यशाची पायरी आहे. अपयशातून शिकण्याची वृत्ती ठेवली तरच आपण अधिक सक्षम होतो. मोबाईलचा अतिरेक, वेळेचा अपव्यय आणि चुकीच्या सवयी यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. स्वतःच्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आजचा काळ हा नोकऱ्या निर्माण करण्याचा (Dadapatil Rajale College)

अनंत ढोले  म्हणाले, उद्योजक होताना अनेक संधी, आव्हाने आपल्याला झेलावे लागतात ती खरी यशाची गुरुकिल्ली आहे. आजचा काळ हा नोकरी शोधण्याचा नसून नोकऱ्या निर्माण करण्याचा आहे. तरुणांनी केवळ पारंपरिक नोकरीकडे न पाहता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता विकसित करावी. व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी त्यामध्ये भांडवल उभारणी, बाजारपेठेचा अभ्यास, स्पर्धेचे स्वरूप आणि जोखीम व्यवस्थापन यावर आपले जागतिक निरीक्षण करून प्रभावी काम झाले पाहिजे. जोखीम घेण्याची तयारी आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द असली की उद्योजकतेत यश निश्चित मिळते.

आपल्या परिसरातच अनेक संधी दडलेल्या

नवकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी उपयोग करून व्यवसाय कसा वाढवता येतो. आपल्या गावात, आपल्या परिसरातच अनेक संधी दडलेल्या आहेत. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून तरुण मोठे उद्योग उभे करू शकतात. त्यांनी ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधींवर प्रकाश टाकला. काही यशस्वी उद्योजकांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीकांत मिसाळ यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी नाते कायम ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.

टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. एम. एस. तांबोळी यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल धाडगे, डॉ. चंद्रकांत काळे, सुनंदा बडे, उमेश तिजोरे, अमोल काळे व शिवम मरकड यांनी मोलाचे सहकार्य केले
याप्रसंगी शेवगाव – पाथर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, चैतन्य ग्रुपचे अध्यक्ष अनंत ढोले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीकांत मिसाळ, उपाध्यक्ष विक्रम राजळे, सदस्य चारुदत्त वाघ, अंकुश राजळे, सचिव डॉ. निर्मला काकडे, अंकुश जगताप, मनोज बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. राजू घोलप, डॉ. राजकुमार घुले, डॉ. गंगाधर लवांडे, डॉ. अतुल चौरपगार, डॉ. जालिंदर कानडे, डॉ. किशोरकुमार गायकवाड, डॉ. विलास बनसोडे आदींची उपस्थिती लाभली.