Rahuri Assembly By-Election : मोनिका राजळे यांचा नागरिकांशी संवाद; भाजपा महायुतीला साथ देण्याचे आवाहन 

Rahuri Assembly By-Election : मोनिका राजळे यांचा नागरिकांशी संवाद; भाजपा महायुतीला साथ देण्याचे आवाहन

0

Rahuri Assembly By-Election : पाथर्डी : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri Assembly By-Election) अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारासाठी बुधवारी पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी, रुपेवाडी, केशव शिंगवे, कडगाव, रेणुकाईवाडी या गावांमध्ये आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व भाजपा महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.

नक्की वाचा : मोनिका राजळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन

स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांनी या मतदारसंघाला नवी दिशा देण्याचे काम केले, विविध योजनांच्या माध्यमातून विकास गावोगावी पोहचवला, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून निघणारी आहे. पण, त्याचं विकासासाठीच योगदान व भविष्यातील समृद्ध मतदारसंघाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन राजळे यांनी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राजळे म्हणाल्या की (Rahuri Assembly By-Election)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत विकासाचा वेग अधिक वाढविण्यासाठी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांना साथ द्या. असेही राजळे म्हणाल्या.