Monika Rajale : पाथर्डी : तालुक्यातील मोहरी (Mohari) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या हस्ते झाले. मेळ वस्ती येथील श्री हनुमान सभामंडप, पेव्हर ब्लॉक बसवणे, भांडेवाडी येथे स्मशानभूमी व मोहरी गावठाण स्मशानभूमी या कामांसाठी एकूण ४० लाख रुपये निधी मंजूर (Funds Approved) करण्यात आला असून त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी
नागरिकांची मोठी सोय होणार
या महत्वपूर्ण कामांमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून विकासाचे ध्येय सातत्याने साध्य केले जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्वांगीण विकासाला चालना मिळणार (Monika Rajale)
या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे जनतेच्या गरजांनुसार विविध विकासकामे राबविण्याचा विश्वास आमदार राजळे यांनी व्यक्त केला.



