Voting : राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान; ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

Voting : राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान; ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

0
Voting : राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान; ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
Voting : राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान; ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

Voting : नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघात (Rahuri Assembly Constituency) ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या टपाली मतदानासाठी मान्य मतदारांसाठी १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी गृह मतदान (Voting) प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास १९ एप्रिल हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. ही प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी (Election Decision Officer) अनुप यादव यांनी दिली.

नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी

मतदान केंद्रावर येणे शक्य नसलेल्यांसाठी सुविधा

निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी व शारीरिक अडचणींमुळे मतदान केंद्रावर येणे शक्य नसलेल्या मतदारांना सुलभता निर्माण करून देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी १२-डी अर्ज भरून या सुविधेची मागणी केली आहे, त्यांनाच गृह मतदानाची सुविधा लागू राहणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार (Voting)

या प्रक्रियेसाठी नियुक्त प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी व एक व्हिडिओग्राफर यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पार पाडली जाणार असून, नमुना १० भरून उमेदवारांनी नियुक्त केलेले मतदान प्रतिनिधीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.


विहित नोंदवहीतील पात्र मतदारांनी १७ व १८ एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेस सहकार्य करावे. पहिल्या भेटीत मतदार घरी उपलब्ध नसल्यास पथक दुसऱ्यांदा भेट देईल, मात्र त्यानंतर मतदानाची संधी उपलब्ध होणार नाही,‌असे आवाहन यादव यांनी केले आहे.