RTE | आरटीईच्या माध्यमातून ३ हजार ४६९ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

0

RTE | नगर : आरटीई (RTE) प्रवेशासाठी सोडतीची प्रक्रिया झाल्यानंतर अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील ३ हजार ४६९ जणांची निवड त्यात झाली आहे. निवड झालेल्यांना २० एप्रिलपर्यंत तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये असलेल्या समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. आतापर्यंत ५९ प्रवेश निश्चित झाले आहेत.

हे वाचा – रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी; काम सुरु न झाल्यास ३० एप्रिलला बैठा सत्याग्रहाचा इशारा

मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

आरटीई २००९ कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाची सोडत ६ एप्रिल २०२६ रोजी काढण्यात आली असून निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यांचे लॉटरीच्या यादीत नाव आहे, त्यांनी ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप

संदेश पाठविण्यात येणार

जिल्ह्यात आरटीईच्या ३४८ शाळांमध्ये ३७६५ जागा असून त्यासाठी ९ हजार २४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. लॉटरीत ३४६९ जणांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० एप्रिलपासून नोंदणीकृत मोबाईलवर राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत संदेश पाठविण्यात येणार आहेत. मात्र, केवळ संदेशावर अवलंबून न राहता पालकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निवड तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पहा – कुठे आणि कसा काढायचा फार्मर आयडी?

सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी किंवा पालिका हद्दीत प्रशासन अधिकाऱ्यांकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. त्यानंतर प्रवेश निश्चित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here