A warning of sitting satyagraha: रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी; काम सुरु न झाल्यास ३० एप्रिलला बैठा सत्याग्रहाचा इशारा

कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्याची मागणी

0

A warning of sitting satyagraha:पाथर्डी: नगरपरिषद हद्दीतील मनोज मुथा दुकान ते खालचा गणपती (कोटकर घर) पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने काँक्रिटीकरण करून द्यावा, अशी मागणी नगरसेविका दिपाली रामनाथ बंग व माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. जर ३० एप्रिल २०२६ पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर आपण पती-पत्नी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कुठलीही पूर्वसूचना न देता बैठा सत्याग्रह (A warning of sitting satyagraha) करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप

कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्याची मागणी (A warning of sitting satyagraha)

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 2022-23 या कालावधीत गांधी चौक ते कोटकर घर (खालचा गणपती) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाच्या स्वरूपात बदल करून गांधी मेडिकल (क्रांती चौक) ते गांधी चौक मुथ्था दुकाने या भागापर्यंतच रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे मुथ्था दुकान ते खालचा गणपती हा उर्वरित भाग अद्यापही दुरावस्थेतच आहे.दरम्यान, ११ मे २०२६ रोजी जैन धर्मियांचा दीक्षा समारंभाचा मोठा कार्यक्रम या परिसरात आयोजित करण्यात आला असून, त्यापूर्वी रस्ता सुस्थितीत असणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी व कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, जर ३० एप्रिल २०२६ पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर आपण पती-पत्नी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कुठलीही पूर्वसूचना न देता बैठा सत्याग्रह करू, असा इशाराही देण्यात आला आहे. या संभाव्य आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या निवेदनाची प्रत आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष अभय  आव्हाड, बांधकाम विभागाचे अभियंता यांना देण्यात आले आहे.