Bribery : नगर : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. ५०हजाराची मागणी केली असता त्यापैकी सुमारे ३५ हजार रुपयांची लाच (Bribery) स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी
संशयित आरोपीचे नाव
अनिल अजिनाथ गोसावी (रा. भूषण नगर केडगाव) असे लाच घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई सापळा रचून केली. या पथकाचे नेतृत्व अजित त्रिपुटे यांनी केले. संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी अनिल गोसावी यांनी पैशांची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ(Bribery)
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला आणि लाच स्वीकारताना गोसावी यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू अल्हाट, अमलदार संतोष शिंदे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, अरुण शेख यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.



