LPG Supply update : LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

0
LPG Supply update : LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर
LPG Supply update : LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

नगर : इराण-अमेरिकेच्या -इस्राईल युद्धाचा (Iran-US-Israeli war) भारतीयांना देखील मोठा फटका बसला आहे. या युद्धामुळे भारतात पुरवठा होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सेवेविषयी मोठी अपडेट (LPG Supply update) हाती आली आहे. भारतात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल ४ वर्षे लागू शकतात, अशी शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भारत सरकारकडून एलपीजीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या युद्धाच्या काळातही एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नक्की वाचा: राज्यात उष्णेतचा पारा ४४ अंशांच्या पार;कुठे किती तापमान?

‘गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन ते चार वर्ष लागणार’ (LPG Supply update)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, ‘सरकारचं लक्ष सध्या एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आहे. देशातील सर्व घरात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की, ‘एलपीजी पुरवठ्यावर सरकारचं लक्ष आहे. हा गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन ते चार वर्ष लागू शकतात. किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो. एलपीजी गॅस निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत’.

अवश्य वाचा: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा ; १२ मे ला होणार मतदान

भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अडथळा (LPG Supply update)

‘कच्च्या तेलाच्या विहिरी रिकाम्या झाल्या किंवा उत्पादन थांबलं आहे, यामुळे तेथून पुरवठा बंद झाला असं स्पष्ट झालेले नाही. देशात व्यवस्थितपणे पुरवठा होण्यासाठी कमीत कमी ३ वर्ष लागण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीपासून इराण-अमेरिका-इस्त्रायलदरम्यान युद्ध सुरू आहे. भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या इराणमध्ये शस्त्रसंधी आहे. परंतु, होर्मुझच्या प्रवेशावरून वाद सुरू आहे. यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचं संकट कायम असल्याचे बोलले जात आहे.