Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण

0

Ravindra Chavan : नगर : राहुरी मतदारसंघातील (Rahuri Legislative Assembly Constituency) विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. यासाठी येत्या २३ तारखेला होणाऱ्या मतदानात (Voting) त्यांना साथ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले. तसेच प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी घराघरांत जाऊन जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या सभेला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिकाताई राजळे, दिलीप भालसिंग तसेच उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान; ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की,

ही पोटनिवडणूक आहे म्हणून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी प्रत्येक बूथवर शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना विजयी करणे हीच कै. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, (Ravindra Chavan)

अक्षय कर्डिले पक्ष संघटन मजबूत करत आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे पुढाकार घ्यावा. ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने कोणीही गाफील राहू नये. तसेच माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण
Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण

अहिल्यानगर व जिल्ह्याच्या विकासासाठी साखळी योजना आणि वांबोरी चारी योजना सुरू असून सध्या कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज लक्षात घेऊन मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे सुमारे तीन टीएमसीने पाणीसाठा वाढेल आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण
Ravindra Chavan : विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक: रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असून त्या लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. संरक्षण विभागाचे कारखाने नगर जिल्ह्यात उभारले जात असून बेलवंडी येथे 600 एकर जागा देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात 30 ते 35 हजार युवकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी पुणे-मुंबईकडे जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सभापती राम शिंदे म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही एक युद्धासारखी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रणांगणात उतरून मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान घडवून आणावे. कै. शिवाजीराव कर्डिले हे वंचित व शोषितांचे नेते होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना निवडून द्यावे. राज्य आणि केंद्रात आपले सरकार असल्याने विकासकामे निश्चित पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.