Guaranteed Price Purchasing Center: पाथर्डीत मका हमीभाव खरेदी केंद्रास मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा 

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी

0

Guaranteed Price Purchasing Center: पाथर्डी: रब्बी हंगामात पिकांचे दर घसरल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत राज्य पणन महासंघाच्या वतीने पाथर्डी येथे मका हमीभाव खरेदी केंद्रास (Guaranteed Price Purchasing Center) मंजुरी देण्यात आली आहे. पाथर्डी व राहुरी तालुक्यासाठी हे एकमेव केंद्र असून पाथर्डी तालुक्यातील अकोला परिसर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित या संस्थेमार्फत खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या केंद्रावर मका पिकाची शासकीय हमीभाव दराने खरेदी केली जाणार असून, यंदा मक्याचा दर प्रतिक्विंटल २४०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. खरेदी प्रक्रिया १ मे २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा पणन अधिकारी  यांनी दिली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नोंदणी प्रक्रिया १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असून, यंदा प्रथमच बायोमेट्रिक थंब प्रणालीद्वारे नोंदणी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अवश्य वाचा- LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी (Guaranteed Price Purchasing Center)

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सात बारा उताऱ्यावर पिकांची नोंद, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संस्थेच्या कार्यालयात करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब आश्रुबा गर्जे यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा व आर्थिक हितसंबंध जपले जावेत हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने पाथर्डी व राहुरी तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.