​Theft : उजळून देते म्हणत वृद्धेचे दागिने केले लंपास; पाथर्डीत येथील घटना

​Theft : उजळून देते म्हणत वृद्धेचे दागिने केले लंपास; पाथर्डीत येथील घटना

0
Theft : उजळून देते म्हणत वृद्धेचे दागिने केले लंपास; पाथर्डीत येथील घटना
Theft : उजळून देते म्हणत वृद्धेचे दागिने केले लंपास; पाथर्डीत येथील घटना

​Theft : पाथर्डी : शहरातील आजिंठा चौक (Ajanta Chowk) परिसरात एका अनोळखी महिलेने चलाखीने विश्वास संपादन करून वृद्ध महिलेकडील दागिने लंपास (Theft) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क (Alert) राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा : पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद

गावाकडे परत जात असताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हौसाबाई विलास थोरात (वय ७०  रा. माळेगाव ता. पाथर्डी) या बुधवारी (ता. १५) सकाळी आठवडे बाजारासाठी पाथर्डी येथे आल्या होत्या. बाजार आटोपून दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्या आजिंठा चौकातून गावाकडे परत जात असताना ही घटना घडली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (​Theft)

यावेळी एक अनोळखी महिला त्यांच्या जवळ येऊन तुमचे मनीमंगळसूत्र व कानातील फुले काढून द्या मी ते उजळून देते असा बहाणा करून विश्वास संपादन केला.वृद्ध महिलेने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गळ्यातील मनीमंगळसूत्र व कानातील फुले काढून दिली. मात्र दागिने घेतल्यानंतर संबंधित महिला तात्काळ तेथून पसार झाली.काही वेळ ती महिला परत न आल्याने हौसाबाईंनी बाजार परिसरात व शहरात तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.या घटनेत २ ग्रॅम वजनाचे कानातील फुले व ३ ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र चोरीला गेले आहे.