Karjat Police Department : पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद

Karjat Police Department : पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद

0
Karjat Police Department : पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद
Karjat Police Department : पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद

Karjat Police Department : कर्जत : कर्जत पोलीस विभागाचे (Karjat Police Department) कर्मचारी चापडगाव (ता.कर्जत) येथे १८ जुलै २०१७ ला रात्री गस्त घालत असताना पिकअप वाहन चालकास पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न थांबता तसाच भरधाव वेगाने पुढे गेल्याने पेट्रोलिंग (Patrolling) करणाऱ्या पथकाने त्यांचा पाठलाग केला असता पोलीस वाहन चालक बबन पवार यांच्यावर गोळी झाडल्याची घटना घडली होती. त्यातील पसार असलेल्या संशयित आरोपीस (The Accused) तब्बल नऊ वर्षांनी कर्जत पोलिसांनी जेरबंद करण्यास यश मिळवले. अक्षय बाजीराव गायकवाड (मिरजगाव, ता. कर्जत) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : पाथर्डीत मोटारसायकल चोरणारा दोन वर्षांनी जेरबंद

गायी चोरीच्या असल्याचा पोलिसांचा संशय

 याबाबतची सविस्तर माहिती अशी की, १८ जुलै २०१७ सहायक फौजदार रत्नाकर मकासरे, पोलीस नाईक एस.डी. लोखंडे आणि वाहन चालक पोलीस नाईक बबन पवार हे सरकारी पोलीस वाहनात रात्री गस्त घालत असताना पहाटे सव्वा तीन वाजता चापडगावहुन कर्जतच्या दिशेने जाताना एक पांढरे पिकअप वाहन निदर्शनास आले. वाहन चालक बबन पवार यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र, पिकअप न थांबताच सुसाट निघाल्याने पोलीसांचा संशय वाढला. त्यांनी पिकअपचा पाठलाग सुरु केला. पिकअपची मागील ताडपत्री उडत असताना त्यामध्ये तीन गायी दिसल्याने त्या गायी चोरीच्या असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पवार यांच्यावर झाडली गोळी (Karjat Police Department)

पिकअपला ओव्हरटेक करत चालक पवार यांनी त्यास पुन्हा थांबण्याचा इशारा केला. पिकअपमध्ये एकूण तीन इसम निदर्शनास आले. यापैकी क्लिनरच्या बाजुला बसलेल्या एका इसमाने पोलीस चालक बबन पवार यांच्यावर गोळी झाडली. यात पवार गंभीर जखमी झाले होते. या घटनेत रेवणनाथ प्रभाकर जाधव (वीट, ता. करमाळा) आणि पद्मराज अर्जुन डोणे (मिजरगाव, ता. कर्जत) यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, अक्षय बाजीराव गायकवाड  हा तिसरा संशयित आरोपी तब्बल नऊ वर्षे पसार होता. आठ दिवसांपूर्वी अक्षय गायकवाड हा पिंपरी चिंचवड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पिंपरी चिंचवड क्राईम ब्राँच युनिट १ आणि कर्जत पोलीस विभागाने संयुक्त मोहिम राबवत त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.