Yellow Alert : पुढील ७२ तास महत्वाचे; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी

0
Yellow Alert : पुढील ७२ तास महत्वाचे; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी
Yellow Alert : पुढील ७२ तास महत्वाचे; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी

Yellow Alert : नगर : महाराष्ट्रात पुढील ७२ तासांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेसोबतच नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

नक्की वाचा : LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

अशी घ्या काळजी (Yellow Alert)

पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांत १७ आणि १८ एप्रिल रोजी हिट वेव्हची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान आधीच ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून काही ठिकाणी ते ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. तज्ञांच्या मते, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे. आवश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक किंवा अन्य द्रवपदार्थांचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पहा : युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; कांद्यापेक्षा गोणीचा खर्च जास्त

हवामानात बदल (Yellow Alert)

१८ एप्रिल नंतर हवामानात बदल होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि आपत्कालीन जोरदार वारांचा समावेश असून शकतो. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. एकूणच, पुढील काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि त्यानंतर संभाव्य अवकाळी पावसाचे मिश्र चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील या बदलांनुसार स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.