Theft Case : पाथर्डीत मोटारसायकल चोरणारा दोन वर्षांनी जेरबंद

Theft Case : पाथर्डीत मोटारसायकल चोरणारा दोन वर्षांनी जेरबंद

0
Theft Case : पाथर्डीत मोटारसायकल चोरणारा दोन वर्षांनी जेरबंद
Theft Case : पाथर्डीत मोटारसायकल चोरणारा दोन वर्षांनी जेरबंद

Theft Case : पाथर्डी : अपघातग्रस्ताला (Accident Victim) मदत करण्याच्या बहाण्याने मोटारसायकल चोरून नेणाऱ्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) तब्बल दोन वर्षांनंतर ताब्यात घेत चोरीचा गुन्हा (Theft Case) उघडकीस आणला आहे. संदीप आप्पासाहेब बर्फे (रा. आडगाव, ता. पाथर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : टंचाई व विकासकामांवर आमदार दाते यांची आढावा बैठक

मोटारसायकल घेऊन पसार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२४  फिर्यादी रामेश्वर बळीराम चव्हाण (वय २२, रा. रामहिंग, ता. जि. बीड) हे त्यांच्या मोटारसायकलवरून महिदा येथून तिसगावमार्गे संगमनेरकडे जात होते. मोहज फाटा येथे सकाळच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्यावेळी एक अनोळखी इसम मदतीसाठी पुढे आला. त्या इसमाने चव्हाण यांच्याशी ओळख वाढवत त्यांना मिरी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, मी बाथरूमला जाऊन येतो असे सांगून तो इसम मोटारसायकल घेऊन पसार झाला. फिर्यादीने चार दिवस स्वतः शोध घेतला, परंतु आरोपीचा काहीही शोध लागला नाही. त्यामुळे २ जुलै २०२४  पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सापळा लावून संशयित ताब्यात (Theft Case)

दरम्यान, आरोपी दीर्घकाळ पसार होता. अखेर १४ एप्रिलला पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त माहिती मिळाली की संबंधित आरोपी मिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जाणार आहे. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, कॉन्स्टेबल भगवान टकते, अक्षय लबडे, संजय जाधव यांचे पथक तयार करून सापळा रचण्यात आला.आडगाव-मिरी रस्त्यावर सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव दादा उर्फ संदीप बर्फे असल्याचे सांगितले. अधिक चौकशीअंती त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कुसळकर करीत आहेत.