नगर : राज्यात सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर (The heat has Intensified) जाणवू लागली आहे. उन्हाच्या झळा तीव्र वाढताना दिसत आहेत. त्यातच अकोल्याचा पारा ४४ अंशांच्या पार (Akola’s Mercury Soars Past 44 Degrees) गेला आहे. अकोला हे राज्य आणि देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी (Hot City) एक शहर बनलं आहे. त्यामुळे उन्हाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. उन्हापासून वाचण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही मार्गदर्शक तत्वे जारी (Guiding Principles) केली आहेत.
नक्की वाचा: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा ; १२ मे ला होणार मतदान
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांची तातडीची बैठक घेतली आहे. रखरखत्या उन्हाचा आणि उष्माघाताचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३७ खाटा राखीव ठेवण्यात आल्यात. ओआरएस व औषध साठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आलेत.
अवश्य वाचा: सोन्यासाठी विहिरीत उतरले संदीप पाठक; ‘घबाडकुंड’ मध्ये संदीप यांचा भन्नाट अंदाज
परभणी आणि हिंगोलीत काय परिस्थिती? (Maharashtra Weather Update)

सलग पाचव्या दिवशी परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून तापमानाने पुन्हा एकदा चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. आज जिल्ह्याचे कमाल तापमान ४१.०४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट उसळली असून आज तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक गरज नसताना घराबाहेर पडणे टाळत आहेत.
रायगड मध्ये आज ४० डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्याला वाढत्या उष्णतेचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून पारा ४४ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनने सर्व आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहे. उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
पुण्यातील तापमान वाढणार (Maharashtra Weather Update)
आज आणि उद्या पुण्यातील तापमान वाढणार असून १७ एप्रिलला पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. पुण्यातील तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. १८ आणि १९ एप्रिलला पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असून शहरात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.



