Women and Child Development : महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवर; राज्यात सर्वाधिक लाभार्थी

Women and Child Development : महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवर; राज्यात सर्वाधिक लाभार्थी

0
Women and Child Development : महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवर; राज्यात सर्वाधिक लाभार्थी
Women and Child Development : महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवर; राज्यात सर्वाधिक लाभार्थी

Women and Child Development : नगर : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या (Schemes) प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा राज्यात (State) आघाडीवर असून, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत’ सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. सन २०२४-२५ मध्ये ७ हजार १२३ लाभार्थ्यांना १९ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले, तर सन २०२५-२६ मध्ये १० हजार १११ लाभार्थ्यांना आतापर्यंत ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.

जिल्ह्यात प्रभावी जनजागृती (Women and Child Development)

केंद्र शासनाच्या प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजनेंतर्गत कोविड-१९ काळात पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यात आला असून, एकूण १ हजार ५२१ मुलांना ५ कोटी ४७ लाख ५६ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात अनाथ प्रमाणपत्राच्या माध्यमातून ५४६ मुलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून, त्यापैकी १५ मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे.

हेही वाचा : महिला व बाल विकास भवन उभारणीला मान्यता; एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

राज्यात प्रथम क्रमांक (Women and Child Development)

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. २७ नोव्हेंबर २०२५ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान प्रभावी जनजागृती व कृतीमुळे हे यश संपादन झाले. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) द्वारे २४ तास सेवा उपलब्ध करून दिली जात असून, मागील वर्षभरात ४८ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

नक्की पहा : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

जिल्ह्यात ‘सखी वन स्टॉप सेंटर’ व ‘महिला सक्षमीकरण केंद्र’ कार्यरत असून, जिल्हा रुग्णालय परिसरात सखी केंद्राची प्रशस्त इमारत आहे. संगमनेर येथे शक्ती सदन व सखी केंद्र सुरू असून अडचणीत आलेल्या महिलांना मदत दिली जाते. तसेच पिंक ई-रिक्शा योजनेद्वारे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मदत केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here