
Sujay Vikhe Patil : श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली. “येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करू,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
नक्की वाचा : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
श्रेयावादाचा घेतला समाचार
डॉ बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयावादाचा देखील त्यांनी आपल्या अनोख्या शैलीतुन समाचार घेतला. यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णाकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा,” अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक (Sujay Vikhe Patil)
श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे सांगताना ते म्हणाले, “हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. आमचा उद्देश स्वच्छ आहे – बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता आहे.” पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो.
आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे, तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते…


