
Water Management : नगर : शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन (Water Management) कृती पंधरवाडा २०२६ अंतर्गत आज ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण अभियान’ हा उपक्रम अहिल्यानगर (Ahilyanagar) मध्यम प्रकल्प विभाग कार्यालय व सिंचन भवन परिसरात उत्साहात राबविण्यात आला. सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेची सुरुवात कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
हेही वाचा : भावाच्या प्रचारासाठी महापौर ज्योती गाडे मैदानात; नागरिकांशी थेट साधला संवाद
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या पंधरवाड्याचा कालावधी दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ असा असून जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे व जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. अभियानादरम्यान जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यालय परिसरासह अंतर्गत विभाग व वसाहतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.
नक्की पहा : जितेंद्र शेळके यांच्या अपघाताबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
येथेही उपक्रम (Water Management)
कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीतील ताजनापूर मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. १ व २, शेवगाव तसेच राहुरी व अहिल्यानगर येथील मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभागांमध्येही स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.


