Electricity Theft : महावितरणने पकडली गडगे बाबाच्या आश्रमातील वीजचोरी; भरारी पथकाची कारवाई

Electricity Theft : महावितरणने पकडली गडगे बाबाच्या आश्रमातील वीजचोरी; भरारी पथकाची कारवाई

0
Electricity Theft : महावितरणने पकडली गडगे बाबाच्या आश्रमातील वीजचोरी; भरारी पथकाची कारवाई
Electricity Theft : महावितरणने पकडली गडगे बाबाच्या आश्रमातील वीजचोरी; भरारी पथकाची कारवाई

Electricity Theft : नगर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे बाबाच्या आश्रमात गुरुवारी महावितरण कंपनीने वीजचोरी पकडली. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता तेथे अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. हे वीजमीटर एका महिलेच्या नावावर आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या विभागाचे संगमनेर कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी दिली.

हेही वाचा : कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे अखेर गजाआड; अंनिसच्या तक्रारीवरून अटक

अंनिसची तक्रार (Electricity Theft)

वडगाव पान येथे दत्तधाम नावाने गडगे महाराज यांचा दरबार भरवला जातो. या आश्रमातील भोंदुगिरीविरुद्ध गडगे बाबा याच्या विरोधात अंनिसने तक्रार दिलेली आहे. तसेच ग्रामस्थही संतापले आहेत. अंधश्रद्धा निमूर्लन समितीने पोलिसांकडे तक्रारी दिल्यानंतर हा आश्रम चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने कारवाई करून वीज चोरी पकडली आहे.

मीटरला बायपास करून वीजचोरी (Electricity Theft)

महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने वीजचोरी पकडली, त्यावेळी तेथे महावितरण कंपनीचे अधिकृत मीटर आहे. त्या मीटरला बायपास करून वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीजचोरी आढळून आलेले मीटर बंद करण्यात आले आहे. हे मीटर वायर जोडून बायपास केले होते. त्यावर दोन एअर कंडिशनर, बोअरवेल आणि लाइटिंग असा एकूण सात किलोवॅट क्षमतेचा भार आहे. संबंधितांकडे महावितरण कंपनीच्या इतरही तीन वीजजोडण्या आहेत. तेथेदेखील तपासणी करण्यात आली आहे.

नक्की पहा : एसटी प्रवासात सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वीजचोरी आढळून आलेल्या मीटरसंदर्भात त्यांना वीज बिल देण्यात येणार आहे. त्यानंतर ते भरण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे. वीज बिल भरले नाही तर त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल. वीजचोरी किती दिवसांपासून सुरू होती, या संदर्भाने सखोल माहिती घेणार असल्याचे वट्टमवार म्हणाले.