Indecent Behavior Towards a Woman : नगर : शहरातील स्वास्तिक चौक -परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तीन तरूणांनी गैरवर्तन (Indecent Behavior Towards a Woman) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने (वय ४०) यासंदर्भात गुरूवारी (ता.१६) कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा (Crime) नोंद केला आहे.
नक्की वाचा : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
अजिंक्य रक्ताटे, प्राजक्त शेरकर व ज्ञानेश्वर (पूर्ण नावे माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या पीडित महिला आपल्या कुटुंबासह स्वास्तिक चौक भागातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. अपार्टमेंटमध्ये पाणी येत नसल्याने त्यांना पाणी भरण्यासाठी खाली यावे लागते. १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेव्हा पीडिता पाणी भरण्यासाठी खाली आली होती, तेव्हा संशयित आरोपींनी अश्लिल वर्तन केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पीडितेच्या पतीलाही धक्काबुक्की (Indecent Behavior Towards a Woman)
संबंधित तरूणांनी पीडितेकडे पाहून अश्लिल हावभाव केले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. जेव्हा पीडितेने या कृत्याचा जाब विचारला, तेव्हा संशयितांनी पीडितेचा हात धरून त्यांना धमकावले. पीडितेने पतीला माहिती दिली. त्यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली आणि ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने १६ एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी दाखल केला आहे.



