Rahuri Election : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मिरी गावात प्रचाराची जोरदार मोहीम राबवत मतदारांशी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे मिरी येथील आठवडे बाजारात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
हेही वाचा : गर्दीचा फायदा घेत मढी येथे दागिने व मोबाईलची चोरी
कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश (Rahuri Election)
या प्रचारादरम्यान वैजू बाबुळगाव व राघो हिवरे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षावर विश्वास ठेवत अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या मोठ्या प्रवेशामुळे भाजप महायुतीला या भागात मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. प्रचार फेरीदरम्यान अक्षय कर्डिले यांनी बाजारपेठेत व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. शेतीमालाच्या दरांपासून पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
नक्की पहा : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरी, तिसगावात पोलिसांचे पथसंचलन
विजयाचा निर्धार (Rahuri Election)
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले, “तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी कधीही गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. त्यांचा वारसा पुढे नेत प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. गावोगावी जाऊन प्रचार अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मिरी, वैजू बाबुळगाव आणि राघो हिवरे परिसरातील नागरिक, शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.



