Shivdurg Trekkers : नगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वारसा जतन व संवर्धन कार्याचा जागर करण्यासाठीं शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने किल्ले धर्मवीरगड येथे १०१ वी गडकोट मोहिम पार पडली. श्रीगोंदा परिसरात प्रथमच गडकिल्ले ‘हेरिटेज वॉक’ घडवून आणला. सकाळी ७ ते १० या वेळेत हे हेरिटेज वॉक संपन्न झाले. या मोहिमेत दौंड, श्रीगोंदा, शिरूर, तालुक्यातून तब्बल ५० सदस्यांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा : अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य
वारसा संवर्धनासाठी पडलेले पुढचं पाऊल (Shivdurg Trekkers)
सामान्य नागरिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जसे पहाटेच्या प्रहरात ‘मॉर्निंग वॉक’ करतात. तशीच हेरिटेज वॉक संकल्पना शहरी भागात सर्वश्रुत आहे. परंतु श्रीगोंदा सारख्या ग्रामीण भागात ही संकल्पना रुजविणे कठीण काम होते. गडकोट,सह्याद्री पायदळी तुडवताना आपला स्थानिक ऐतिहासिक वारसा जतन करणे आपले संविधानिक कर्तव्य आहे. स्वतःच्या आरोग्याबरोबरच दुर्लक्षित आपल्या पूर्वजांचा इतिहास व वारसा संवर्धन करण्यासाठी शिवदुर्गने पुढाकार घेऊन प्रथमच ‘हेरिटेज वॉक’ घडवून आणला. याचे सर्वांनी स्वागत केले.
नक्की पहा :‘लेन्सकार्ट’ला नगरसेवक निखिल वारेंनी विचारला जाब; व्यवस्थापकांनी दिले हे उत्तर

अभ्यासपूर्ण भटकंती (Shivdurg Trekkers)
किल्ले धर्मवीरगड फक्त शौर्यस्तंभ पुरता मर्यादित नसून पेडगाव येथील अनेक अपरिचित पुरातन वारसा स्मारकांची अभ्यासपूर्ण भटकंतीसह सहभागी बहुतेकांनी हा वारसा प्रथमच पहिला.
इतिहास प्रसिध्द खंडोबाचा माळ, शंभूराजांची कुप्रसिद्ध धिंड निघालेला परिसर. साडेतीन लाखांच्या फौजेला खापरी पाईप लाईनने पाणीपुरवठा करणारी सरस्वती नदीवरील भव्य हत्तीमोट, भवानी मंदिर, भैरवनाथ मंदिर, शौर्यस्तंभ, रामेश्वर मंदिर,लक्ष्मी नारायण मंदिर मल्लिकार्जुन मंदिर, राजसदर, राजदरबार, भीमा नदीचे पात्र , हत्ती मोट,इत्यादी वारसा स्मरकांची अभ्यासपूर्ण माहिती, डोळसपणे भटकंती घडवून आणली. शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी वारसा स्मारकांचा व घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यासपुर्ण संदर्भासहित विविध पैलू उलगडवले. श्रीगोंद्याच्या इतिहासाची गहाळ पाने जोडण्याचे प्रयत्न सुरू केले.
व्हिडीओ : संगमनेर येथील गडगे बाबा अखेर अटकेत
यांचा सहभाग (Shivdurg Trekkers)
शिवव्याख्याते लक्ष्मण नाईकवाडी, पुरातन विभागाचे मच्छिंद्र पंडित यांनी मार्गदर्शन केले. शिवदुर्गच्या घारगाव टीमच्या वतीने या ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर, तुषार चौधरी, चेतन चौधरी, अजित दळवी, अशोक गदादे, दिगंबर भुजबळ, अमोल बडे,जालिंदर पाडळे, ईश्वर कोठारे, रहीम हवालदार, संभाजी चौधरी, उत्तम कुलांगे, राकेश अग्रवाल, संतोष रोकडे, शितल गदादे, सुचित्रा दळवी, स्वाती मुळे, निरज पाडळे, आविष्कार इंगळे यांसह अनेक महिला व बालमावळ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.



