Akshaya Tritiya | अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ११,१११ आंब्यांचा नैवेद्य

0

Akshaya Tritiya | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त (Akshaya Tritiya) श्री विशाल गणेशाला ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. श्री विशाल गणपतीचा आज (ता. १९) सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia), छायाताई फिरोदिया, आशाताई  फिरोदिया,  अनुष्का  फिरोदिया, गौरव भंडारी , काव्या  फिरोदिया  यांच्या हस्ते महापुजा करुन आरती करण्यात आली.

हे वाचा – अहिल्यानगरच्या सुपुत्राचा देशपातळीवर गौरव; आदित्य डेरेला केंद्राचा राष्ट्रीय पुरस्कार

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, गणेश राऊत आदी उपस्थित होते.

नक्की पहा : नेवासा मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त (Akshaya Tritiya)

याप्रसंगी पंडितराव खरपुडे  म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला. या दिवशी  सत्ययुगाचा प्रारंभ झाली. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सात त्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. असेच अक्षयतृतीयानिमित्त आंबा स्वरुपात भाविकांनी दान दिले असल्याचे सांगून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले.

हे पहा – राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी; मतदारांना काय वाटतं?

यावेळी प्रा. माणिकराव विधाते यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दानशूर भाविकांचे आभार मानले. अशोकराव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. ज्ञानेश्वर रासकर यांनी आभार मानले. यावेळी विजय कोथिंबिरे म्हणाले की, यासाठी फिरोदिया परिवार आणि गणेश भक्त यांचे सहकार्य लाभले. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here