Death due to Heatstroke : शेतात काम करताना युवकाचा मृत्यू; उष्माघाताचा संशय

Death due to Heatstroke : शेतात काम करताना युवकाचा मृत्यू; उष्माघाताचा संशय

0
Death due to Heatstroke : शेतात काम करताना युवकाचा मृत्यू; उष्माघाताचा संशय
Death due to Heatstroke : शेतात काम करताना युवकाचा मृत्यू; उष्माघाताचा संशय

Death due to Heatstroke : पाथर्डी : तालुक्यातील निवडुंगे (Niwdunge) येथे एका तरुण शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उष्माघातामुळे हा मृत्यू (Death due to Heatstroke) झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. राधाकृष्ण रामचंद्र मरकड (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा : मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१९) सकाळी मरकड हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावरांसाठी गवत कापण्यासाठी गेले होते. घरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातून त्यांनी एक ओझे गवत घरी आणून ठेवले. त्यानंतर दुसरे ओझे आणण्यासाठी ते पुन्हा शेतात गेले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते शेतात गेले होते; मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. वडील रामचंद्र मरकड यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता राधाकृष्ण हे शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या अंगावर प्रचंड घाम असून शरीराचे तापमान अत्यंत वाढलेले होते. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मरकड हे कुटुंबातील एकुलते एक कर्ते पुरुष (Death due to Heatstroke)

नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने गावातील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिसगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला; मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले त्यानंतर त्यांना मृत घोषित केले. राधाकृष्ण मरकड हे कुटुंबातील एकुलते एक कर्ते पुरुष होते. तीन एकर शेती आणि दुग्धव्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे वृद्ध आई-वडिलांवर आधार हरपला असून कुटुंब अंधारात लोटले गेले आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

तीन विवाहित बहिणी असलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उष्माघातामुळेच राधाकृष्ण मरकड  मृत्यू झाल्याचे माणिक सावंत,अमोल मरकड,उत्तम नामदेव मरकड,आबासाहेब मरकड,अबिद शेख,अमोल लक्ष्मण मरकड यांनी यावेळी सांगितले.या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे व प्रकाश बडे यांनी पंचनामा केला असून हेडकॉन्स्टेबल अण्णा पवार पुढील तपास करत आहेत. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली असून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.