Gorakhnath Jayanti : मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Gorakhnath Jayanti : मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Gorakhnath Jayanti : मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Gorakhnath Jayanti : मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Gorakhnath Jayanti : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा (Manjarsumba) येथे गोरक्षनाथ जयंती (Gorakhnath Jayanti) उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा व ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला. या वेळी शिव महापुराण कथा हारेशजी गिरी महाराज विंचुरकर (Hareshji Giri Maharaj Vinchurkar) यांनी प्रभावीपणे सांगितली.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात पावणे चार हजार रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत

विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन

सप्ताहादरम्यान शिव महापुराणातील महात्म्य, चंचला वैराग्य, शिवलोक प्राप्ती, कार्तिक स्वामी जन्म, गणेश विवाह, बकासुराला वर प्राप्ती, शिवाचा अवधूत अवतार, शिवमंत्र महोत्सव, बारा ज्योतिर्लिंगांचे महात्म्य तसेच श्रावण भक्ती अशा विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्त दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी सहा ते सात विष्णुसहस्रनाम, सकाळी आठ ते अकरा नवनाथ पारायण, दुपारी दोन ते चार भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री साडेसात ते साडेनऊ महापुराण कथा असे नियोजनबद्ध कार्यक्रम झाले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली (Gorakhnath Jayanti)

कथेसाठी साथ-संगत दत्ता महाराज तापकीरे, श्रीकांत महाराज गवळी, भरत महाराज, गोपाळ बापू गुरव आणि विठ्ठल महाराज चव्हाण यांनी दिली.सोमवारी (ता. २०) सायंकाळी सात वाजता दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत ईश्वर महाराज कदम शास्त्री यांचे कीर्तन झाले. सप्ताहादरम्यान काकड्याचे नेतृत्व शिवाजी ढोकणे महाराज, विठ्ठल ढोकणे महाराज, काशिनाथ ढोकणे, रावसाहेब नवघरे, बबनदादा गडाख आणि एकनाथ ढोकणे यांच्यासह वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले.

मांजरसुंबा परिसरात भक्तिमय वातावरण

तसेच पारायण व्यासपीठाची जबाबदारी बाबासाहेब गंगाधर कदम, शंतनू महाराज लांबे यांनी सांभाळली. हरिपाठ व नामजपासाठी प्रियंका कर्डिले, रोहिदास राधाकिसन कदम, काशिनाथ ढोकणे, भाऊसाहेब कदम, काशिनाथ कदम, प्रल्हाद कदम, रोहिदास कदम, अण्णा गावजी कदम, दत्तात्रय कदम, दादासाहेब कदम आदींचा सहभाग लाभला. चोपदार म्हणून सारंग कदम व भाऊसाहेब कदम यांनी कार्य पाहिले. जालिंदर कदम, शंकरराव कदम, विलास भुतकर, विजय वाघमारेया सर्व धार्मिक उपक्रमांमुळे मांजरसुंबा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.