Dutt Dham Govt: संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम सरकार (Dutt Dham Govt) मधील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला तालुका पोलिसांनी दत्त धाम येथे रविवारी पुढील तपासासाठी आणले होते. यावेळी अंनिसच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे देखील उपस्थित होत्या. यावेळी भोंदू गडगे बाबाचे वडगाव पान येथील दत्त धाम सरकार पोलिसांनी सील केले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम सरकार मधील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला तालुका पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काल शनिवारी (ता.१९) रात्री सुकेवाडी रोड येथील त्याच्या मीरा हॉटेल येथे तपासासाठी आणले असता पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे म्हणाले की, तपासाचा भाग म्हणून ही कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे का? यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया देत, हा तपासाचा भाग असून सखोल चौकशीनंतरच अधिक माहिती स्पष्ट होईल असे सांगितले.
अवश्य वाचा- संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गुन्ह्याशी संबंधित धागेदोरे शोधण्यासाठी पंचनामा (Dutt Dham Govt)
पोलिसांनी आरोपी राजेंद्र गडगे याच्या मालकीच्या जागेवर धाड टाकून पंचनामा केला. गुन्ह्याशी संबंधित धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. त्यांनतर रविवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम सरकार मधील भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला तालुका पोलिसांनी दत्त धाम येथे रविवारी पुढील तपासासाठी आणले होते. यावेळी अखेर भोंदू गडगे बाबाचे वडगाव पान येथील दत्त धाम सरकार पोलिसांनी सील केले आहे. त्यांनतर पंचनामा करण्यात आला. तालुका पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे स्वतः उपस्थित होते. तसेच पोलीस उप निरीक्षक शालेमन सातपुते, विकास कले यांच्या सह, तालुका आरोग्य अधिकारी व पोलीस पथक होते. 1तपासात अडथळा येऊ नये म्हणून सध्या अधिक तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.



