Offensive Statement : पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एका पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायातील (Warkari sect) संत-महंतांविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य (Offensive Statement) केल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पाथर्डी वारकरी संप्रदाय व हिंदुत्ववादी संघटनांच्या (Hindutva Organizations) वतीने करण्यात आली आहे.
नक्की वाचा : बांधकाम साहित्याच्या नावाखाली ३ लाख ३३ हजारांची फसवणूक
निवेदनात म्हटले की
यासंदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निवेदनात म्हटले की, लवांडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायातील संतांविषयी संप्रदायामध्ये घुसखोरी अशा प्रकारचे आरोप करत अवमानास्पद भाषा वापरली. या वक्तव्यामुळे राज्यातील लाखो वारकरी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, धार्मिक श्रद्धेला धक्का बसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तेढ निर्माण होण्याची शक्यता (Offensive Statement)
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा कणा मानला जातो. संत परंपरेतून समाजाला नैतिक मूल्ये, समता व भक्तीचा संदेश देण्यात आला आहे. अशा पवित्र परंपरेतील संत-महंतांविषयी सार्वजनिक व्यासपीठावरून अपमानास्पद विधान करणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, यामुळे समाजात गैरसमज, तणाव आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासोबतच, अशा वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन करण्याचा इशारा
दरम्यान, या प्रकरणात तत्काळ कारवाई न झाल्यास पाथर्डी तालुक्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी स्वीकारले. यावेळी गोविंद महाराज जाटदेवळेकर, दिपक महाराज काळे,ॲड. नामदेव जायभाये, सोमनाथ बंग, भारत लिपारे, प्रथमेश नाकील, चिकू खेडकर आदी उपस्थित होते.



