Fraud : बांधकाम साहित्याच्या नावाखाली ३ लाख ३३ हजारांची फसवणूक

Fraud : बांधकाम साहित्याच्या नावाखाली ३ लाख ३३ हजारांची फसवणूक

0
Fraud : बांधकाम साहित्याच्या नावाखाली ३ लाख ३३ हजारांची फसवणूक
Fraud : बांधकाम साहित्याच्या नावाखाली ३ लाख ३३ हजारांची फसवणूक

Fraud : पाथर्डी : तालुक्यातील मढी येथील सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याची बांधकामासाठी लागणारे साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या आमिषाने तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) संबंधित संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षभरात १५५ बालविवाह रोखण्यात यश

सावळे यांचा विश्वास संपादन

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश सावळेराम सावळे (वय ६२, रा. मढी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) हे कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी मढी येथे नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी गावातील ठेकेदार दत्तात्रय उत्तम गाडेकर यांच्याकडे काम सोपविले होते. घराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरविण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असताना त्यांच्याकडे रोजंदारीवर काम करणारा राजू महादेव देवकर (रा. बाबुर्डी रस्ता, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याने सावळे यांचा विश्वास संपादन करत मी तुम्हाला कमी दरात सिमेंट, वाळू, खडी व लोखंड उपलब्ध करून देतो असे आमिष दाखवून त्याने सावळे यांना पैसे देण्यास प्रवृत्त केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फोन उचलणे केले बंद (Fraud)

देवकर याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सावळे यांनी १७ फेब्रुवारी २०२३ ते २२ मे २०२३ या कालावधीत वेळोवेळी फोन पे व गुगल पे या ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ३ लाख ३३ हजार रुपये त्याच्या खात्यावर पाठविले. यातील काही व्यवहार ठेकेदार दत्तात्रय गाडेकर यांच्या उपस्थितीतही करण्यात आले होते, असे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही देवकर याने कोणतेही बांधकाम साहित्य पुरविले नाही. उलट आज देतो, उद्या देतो अशी कारणे देत वेळकाढूपणा केला. काही दिवसांनी त्याने फोन उचलणे बंद केले आणि संपर्कही तोडला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सावळे यांच्या लक्षात आले. सावळे यांनी शनिवारी (ता. १८) पाथर्डी पोलीस ठाण्यात राजू देवकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे हे करत आहेत.