Child Marriage : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ‘सतर्कता दिवस’; बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती

Child Marriage : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ‘सतर्कता दिवस’; बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती

0
Child Marriage : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ‘सतर्कता दिवस’; बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती
Child Marriage : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ‘सतर्कता दिवस’; बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती

Child Marriage : नगर : जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ‘सतर्कता दिवस’ पाळण्यात आला. विपला फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (सीएमपीओ), अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका तसेच आशा स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवत बालविवाह रोखण्याची सामूहिक बांधिलकी व्यक्त केली.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षभरात १५५ बालविवाह रोखण्यात यश

बालविवाह न करण्याची शपथ (Child Marriage)

जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा आणि धर्मगुरू यांच्या सहकार्याने जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी गावागावांत व शाळांमध्ये जनजागृती मोहिमा राबवल्या जात असून हजारो नागरिकांना बालविवाह न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेषतः अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती देण्यात येत आहे. विपला संस्थेच्या संचालक ज्योती नाळे यांनी सांगितले की, “बालविवाह हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून कोणत्याही धार्मिक कारणाखाली त्याचे समर्थन होऊ शकत नाही. प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सतर्कतेमुळे अशा घटनांमध्ये घट झाली असली, तरी ही प्रथा पूर्णपणे संपवणे आवश्यक आहे.”

नक्को पहा : अटक होताच गडगे बाबाचा थयथयाट; धर्माचे खंडन होत असल्याचा दावा

पाच लाखांहून अधिक बालविवाह रोखले (Child Marriage)

दरम्यान, गेल्या काही वर्षांत राबवलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. बालविवाहाच्या घटनांची माहिती आता नागरिक स्वतःहून प्रशासनाला देत आहेत आणि तत्काळ कारवाईही केली जात आहे. या सकारात्मक बदलाच्या जोरावर २०३० पूर्वी जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. विपला फाउंडेशन ही ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन’ या देशव्यापी जाळ्याची भागीदार संस्था असून, देशातील ४५० हून अधिक जिल्ह्यांत बालविवाहाविरुद्ध मोहिमा राबवल्या जात आहेत. या मोहिमांद्वारे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक बालविवाह रोखण्यात यश आले आहे.