नगर : स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून ‘गरीब महिलांच्या तोंडचा घास पळवल्या’ चा प्रकार कर्जतमध्ये (Karjat News) घडला आहे. कर्जत तालुक्यातील तब्बल ४३९ बचत गटातील महिलांची ४ लाख ८२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा (Fraud Against Women)धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून ११०० रुपये उकळण्यात आले,(Fraud Under the Guise of Sewing Machines) मात्र एकाही महिलेला मशिन मिळाले नाही. या प्रकरणी पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी थेट कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा: अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; पोलिसांना दिले निर्देश
प्रकरण नेमकं काय? (Karjat News)
सरोज सुतार या २०१९ पासून सी.आर.पी. म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात. याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने त्यांच्याशी संपर्क साधला. ‘७५०० रुपयांत दोन शिलाई मशिन देतो. सध्या फक्त ११०० रुपये बुकिंगसाठी भरा,’ असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील ४३९ गरजू महिलांकडून पैसे गोळा करून एकूण ४ लाख ८२ हजार ९०० रुपये प्रशांत अडसूळला नेऊन दिले. मात्र पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नसल्याची बाब समोर आली आहे.
अवश्य वाचा: सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटाचा घेर वाढलाय? ‘हे’ उपाय करा,आई झाल्यानंतरही दिसाल फिट…
शासकीय योजनेचा बुरखा पांघरून गरीब महिलांची फसवणूक (Karjat News)
फसवणूक झाल्याची खात्री पटताच सरोज सुतार यांनी कर्जत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. बचत गटातील महिला या अत्यंत कष्टाने पैसे साठवतात. शिलाई मशिनमुळे उत्पन्न मिळेल या आशेवर अनेक महिलांनी उसने-पासने करून ११०० रुपये भरले होते. मात्र या अडसूळने शासकीय योजनेचा बुरखा पांघरून गरीब महिलांची फसवणूक केली आहे. हा सरळ विश्वासघात आहे. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत,’ अशी मागणी या महिलांनी केली आहे. तसेच तपासात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील बचत गटांनी दिला आहे. आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करणार हेच पाहणे महत्वाचं ठरणार आहे.



