Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

0
Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू
Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

Rahuri Election : नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

हेही वाचा : राहुरी मतदारसंघात चार दिवस ड्राय डे जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच प्रवेश (Rahuri Election)

या आदेशानुसार संबंधित परिसरात मंडपे व दुकाने उभारण्यास, अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यास तसेच मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस उपकरणे, ध्वनिक्षेपक आदी इलेक्ट्रॉनिक साधने बाळगण्यास मनाई आहे. तसेच खाजगी वाहने आणण्यास व राजकीय पक्षांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात केवळ मतदार व निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनाच प्रवेश राहील.

नक्की पहा : खरवंडी फाट्यावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

सदर आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये जारी करण्यात आला असून तो मतदान सुरू झाल्यापासून मतदान समाप्त होईपर्यंत लागू राहील.