Dry Day : नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २१ ते २३ एप्रिल या कालावधीत तसेच मतमोजणीच्या ४ मे रोजी संपूर्ण दिवस ड्राय डे लागू करण्यात आला असून संबंधित क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे, असा आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केला आहे.
हेही वाचा : राहुरी मतदारसंघात प्रचार कालावधी संपताच बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध
मद्यविक्री पूर्णपणे बंद (Dry Day)
मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे २१ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी ४ मे रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघ व मतमोजणी केंद्र परिसरात कोरडा दिवस काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकांनी देशी व विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) तसेच मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ व संबंधित नियमांच्या आधारे हा आदेश लागू करण्यात आला आहे. संबंधित सर्व परवानाधारकांनी या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
नक्की पहा : अक्षय कर्डिले भाषणात भावूक; वडिलांच्या आठवणींनी दाटले डोळे, पत्नी प्रियंका व बहिण यांनाही अश्रू अनावर
आदेश मोडल्यास कारवाई (Dry Day)
नमूना आय, सीएल-१, पीएलएल, बीआरएल या घटकांना उत्पादनास परवानगी असली तरी कोरडा दिवस कालावधीत कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करून त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.



