District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा

अनधिकृत पाणी उपसा थांबवण्याचे आदेश

0
District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा
District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा

District Collector : पाथर्डी : टंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. पाणीटंचाईग्रस्त (Water-scarce areas) गावांचा आढावा स्वतः घेऊन, कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधीच्या (Elected Representatives) सूचनेची वाट न पाहता तत्काळ अहवाल सादर करावा. ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे, ते प्रस्ताव त्वरीत पाठवून नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करावा, अशा सक्त सूचना आणि निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.

नक्की वाचा : प्रांत व तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर; नागरिकांची कामे खोळंबली

दररोज पाणी नमुन्यांची तपासणी करावी

पाथर्डी येथील तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देत कामकाजात शिथिलता अजिबात चालणार नसल्याचा इशारा दिला. जिल्हाधिकारी आशिया म्हणाले, टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव तातडीने पंचायत समिती व तालुका महसूल प्रशासनाकडे सादर करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले असून कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी आरोग्य विभागाने दररोज पाणी नमुन्यांची तपासणी करावी. यासाठी आवश्यक ते कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनधिकृत पाणी उपसा थांबवण्याचे आदेश (District Collector)

ग्रामसेवक व तलाठी यांनी आपल्या हद्दीत सतत सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले. ज्या भागांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी विजपंपांद्वारे होणारा अनधिकृत पाणी उपसा तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले. विज वितरण कंपनीने अशा अनधिकृत जोडण्या त्वरित बंद कराव्यात. यासाठी जलसंधारण विभाग, विज वितरण कंपनी व तलावांच्या मालकीच्या संस्था यांनी संयुक्तपणे जबाबदारी पार पाडावी, असे सांगण्यात आले. दोन्ही तालुक्यांतील पशुधनासाठी लागणारे पाणी व चारा याचे नियोजन करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले. 

कारवाईचा इशारा

हवामान विभागाने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने टंचाई काळात तसेच त्यानंतरही अवैध पाणी उपसा रोखणे अत्यावश्यक आहे. तलावांमधील पाण्याचा अनधिकृत उपसा तात्काळ बंद करावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला. टँकर भरण्याच्या व पाणी वितरणाच्या प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी टँकर भरताना व रिकामे करताना काढलेले फोटो तारीखवार सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. मी प्रत्यक्ष भेट देऊन या नोंदी तपासणार आहे; कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत,”असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.