Dutt Dham Govt : संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम सरकार (Dutt Dham Govt) या नावाने स्वतःचे प्रस्थ निर्माण करणाऱ्या भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून आज गडगे याच्या निवासस्थानाची पोलिसांनी झडती (search) घेतली.
नक्की वाचा : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या बदलीसाठी विशिष्ट समाजाचे प्रयत्न?; पोलिसांच्या धडाकेबाज कारवायांना वेग
तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर
संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी महत्त्वाचे पुरावे गोळा करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज गडगे याच्या निवासस्थानी आणि आश्रमात ‘सर्च ऑपरेशन’ राबवले. या कारवाईदरम्यान तपासाला दिशा देणारे काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. राजेंद्र गडगे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पुराव्यांच्या शोधासाठी आज (ता. २२) त्याच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या असून, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न (Dutt Dham Govt)
या कारवाईच्या वेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे फौजफाट्यासह उपस्थित होते. अटकेत असलेल्या राजेंद्र गडगे याला देखील तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. भोंदूगिरीच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारवाईमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आता जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरवणार आहेत.



