Local Crime Branch : कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कठोर कारवाई करण्याचे आदेश

0
Local Crime Branch : कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : नगर : राशीन (ता. कर्जत) येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ६२ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सुटका करत मोठी कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात (Accused in custody) आले असून सुमारे ६५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भोंदू गडगेबाबाच्या निवासस्थानाची पोलीस उपअधीक्षकांकडून झाडाझडती

कठोर कारवाई करण्याचे आदेश

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसंदर्भात माहिती गोळा करून कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, गणेश लबडे, अतुल लोटके, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे तसेच चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पथकाची तातडीने घटनास्थळी धाव (Local Crime Branch)

कर्जत तालुक्यात माहिती घेत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, राशीन गावातील कुरेशी गल्ली येथे गोवंशीय जनावरे निर्दयतेने टेम्पोमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेण्याची तयारी सुरू आहे. या माहितीनुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पथकाने पाठलाग करून फरदीन रफीक कुरेशी (वय २२, रा. कुरेशी गल्ली, राशीन ता. कर्जत) याला ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता , टेम्पोमधील जनावरे अन्वर मजीद कुरेशी (फरार), साहिल गफार कुरेशी (फरार) आणि इरफान उर्फ बबलू माजिद कुरेशी (फरार), सर्व रा. कुरेशी गल्ली, राशीन ता. कर्जत यांची असून ती धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होती.या कारवाईत पोलिसांनी १८ लाख ३५ हजार रुपये किमतीची ६२ गोवंशीय जनावरे आणि ४७ लाख रुपये किमतीची तीन वाहने असा एकूण ६५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागविणे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.