Cleanliness campaign : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पधंरवडा-२०२६ अंतर्गत धरण, कालवा स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण व पांदन रस्ता दुरुस्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून सकाळी ७ ते ९ या वेळेत अहिल्यानगरमध्ये सीना नदी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांनी सतर्क राहावे
यांचा सहभाग
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग व प्राधिकरण कार्यालय यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जलसंपदा विभागातील मंडळांतर्गत व विभागांतर्गत जवळपास ३५ ते ४० अधिकारी व कर्मचारी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोहिमेत प्रामुख्याने सहाय्यक अधीक्षक अभियंता ओ. अं. भंडारी, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपकार्यकारी अभियंता यू. व्ही. कंगणकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता भूषण उबाळे व उपविभागीय अधिकारी इंद्रजीत यादव यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
नक्की पहा : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना
मनपाची साथ (Cleanliness campaign)
या स्वच्छता मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिकेचीही साथ मिळाली. मनपाचे ७ कर्मचारी व २ घंटा गाड्या सदर उपक्रमासाठी उपस्थित होत्या. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सीना नदी पात्रातील गोळा केलेला कचरा उचलून तो कचरा डेपोमध्ये पोहोचविण्यात आला.



