Illegal Sand Mining : कोपरगावात अवैध वाळू उपसा; स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Sand Mining : कोपरगावात अवैध वाळू उपसा; स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Illegal Sand Mining : कोपरगावात अवैध वाळू उपसा; स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal Sand Mining : कोपरगावात अवैध वाळू उपसा; स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Sand Mining : नगर : कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदी (Godavari River) पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नक्की वाचा: टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अशोक उत्तम बोरुडे (वय २६, रा. मुर्शदपूर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे वाळू उपशासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि २५ हजार रुपये किमतीची लोखंडी केणी असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाईचे आदेश (Illegal Sand Mining)

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार प्रशांत राठोड, रमिजराजा आत्तार, प्रमोद जाधव, विशाल तनपुरे, भगवान थोरात आणि चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.

२२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, माहेगाव शिवारात एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करत आहे. या माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

कारवाईदरम्यान एक इसम ट्रॅक्टरला जोडलेल्या लोखंडी केणीच्या सहाय्याने वाळू उपसा करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. संशयित आरोपी अशोक उत्तम बोरुडे (वय २६, रा. मुर्शदपूर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाळू उपशासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले.


या कारवाईत आरोपीकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि २५ हजार रुपये किमतीची लोखंडी केणी असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.