Government Employees Strike : पाथर्डी : राज्यभर सुरू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा (Government employees strike) गुरुवारी (ता. २३) तिसरा दिवस असून पाथर्डी तालुक्यातही (Pathardi Taluka) या संपाचा मोठा परिणाम जाणवत आहे. महसूल, शिक्षण, आरोग्य तसेच इतर शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन (movement) केल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे अक्षरशः खोळंबली आहेत. आपत्ती व्यवस्थापन व निवडणूक कामे वगळता बहुतांश शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
नक्की वाचा: टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ
कर्मचाऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका
जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून राज्यभरात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून तिसऱ्या दिवशीही संप कायम ठेवला आहे. पाथर्डी येथे महसूल कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही संपात सक्रिय सहभाग नोंदवला. गुरुवारी (ता. २३)तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा (Government Employees Strike)
अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक मिरपगार, दगडू आमले, तसेच आरोग्य विभागाचे सुभाष कुलकर्णी, परमेश्वर बडे, उत्तम गिरी, सचिन निकम, राहुल गुंजाळ, चंद्रसिंग जाधव, चंद्रकांत पोटभरे, निखिल इंगळे, उद्धव साबळे, सोनल नगराळे, प्रदीप एकशिंगे, सखाराम आमले आदी कर्मचारी सहभागी झाले होते.दरम्यान, संपामुळे नागरिकांच्या शासकीय कामावर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.



