Indian Flag : नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Indian Flag : नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
Indian Flag : नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Indian Flag : नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Indian Flag : नगर : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व विशेष प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :  ‘पनीर’च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?

अवहेलना टाळावी

विविध प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिक वापर होत असतो. मात्र, कार्यक्रमानंतर काही ठिकाणी राष्ट्रध्वज जागोजागी पडलेले दिसतात, जे अत्यंत दुर्दैवी व अवमानकारक आहे. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाची अवहेलना होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे.

नक्की पहा :  कायनेटिक चौकात वाहतूक कोंडी; नगरसेवक आक्रमक

अशी घ्या काळजी (Indian Flag)

​ध्वजसंहितेतील सर्व नियम व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. खराब किंवा माती लागलेले राष्ट्रध्वज गोणीत किंवा कपड्यात व्यवस्थित ठेवून, ती गोणी किंवा कपडा शिवून बंद करावा. अशासकीय संस्था, संघटना व नागरिकांनी असे राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असेही प्रशासनाने कळविले आहे.