
Karjat Nagar Panchayat : कर्जत : नगरपंचायतीचे (Karjat Nagar Panchayat) सर्व १५ नगरसेवकांचे गटनेता पद माझ्याकडेच असून आपण आजमितीस त्याच पदावर असून उप गटनेता पदावर असणाऱ्या व्यक्तीस कोणतीच सभा अथवा बैठक घेण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे घटनेतील तरतुदीची पायमल्ली होत असल्याने कर्जतचे उप गटनेते सतीश पाटील (Satish Patil) यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी गटनेते संतोष मेहेत्रे यांनी नगरविकास विभागाचे सचिव (Secretary, Urban Development Department) यांना पत्र देवून केली आहे. या पत्राने पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
नक्की वाचा : टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत उफाळला सुप्त असंतोष
मागील वर्षीच कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस वाढल्याने आमदार रोहित पवार यांच्या गटातील तब्बल ११ नगरसेवकांनी बंड पुकारले होते. यात कर्जत नगरपंचायतीचे गटनेते, उप गटनेते यांच्यासह नगरसेवक-नगरसेविकांचा समावेश होता. त्यानंतर या सर्व बंडखोर नगरसेवकांनी सभापती राम शिंदे बरोबर मेळ घालत सत्तांतर घडवत भाजमध्ये प्रवेश केला. यावेळी राम शिंदे यांनी उर्वरीत काळासाठी दोन नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष पदाचे नावे जाहीर केली होती. मात्र, ठरलेल्या सूत्रानुसार बदल न झालेल्या पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत सुप्त असंतोष उफाळला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Karjat Nagar Panchayat)
नुकतेच उप गटनेते सतीश पाटील यांनी शुक्रवार, (ता. २४) कर्जतच्या सर्व नगरसेवक-नगरसेवकांना सर्वसाधारण सभा आणि बैठकीचे पत्र पाठवल्याने गटनेते तथा विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांनी सतीश पाटील यांना कायदेशीर बाबीची जाणीव करून देत चक्क नगरविकास विभागाचे महाराष्ट्र सचिव यांना त्यांचे उप गटनेते पद रद्द करण्याची मागणी केली आहे. मेहेत्रे यांनी सदरच्या पत्रात गटनेता पदाच्या जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या तरतुदीनुसार गटनेता असताना उप गटनेत्यास बैठक बोलविण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. त्यांच्या या पत्राने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी काळात धुसफूस वाढण्याची शक्यता
गटनेता निवडीच्या घटनेच्या अधिकार कलम ६ च्या तरतुदीनुसार उप गटनेते सतीश पाटील नियमानुसार काम करीत नसल्याचे सिद्ध होत असून त्यांची नियुक्ती आणि उप गटनेते पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. संतोष मेहेत्रे यांच्या या पत्राने पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून आगामी काळात धुसफूस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात राम शिंदे कसा मार्ग काढतील हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


