
Illegal Slaughterhouse : नगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तल खाण्यावर (Illegal Slaughterhouse) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून चार गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. काही गोमांस यासह ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) तिघा संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
संशयित आरोपीचे नावे
जाकिर शब्बिर कुरेशी वय- ५८, रा. सुबेदारगल्ली झेंडीगेट, अहिल्यानगर), शेर रऊप कुरेशी, नादिर अजिज कुरेशी (दोघे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), असे गुन्हे दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली (Illegal Slaughterhouse)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू असलेले कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिले. मुकुंदनगर परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाणे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.
कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सलगुडे, पोलीस आमदार विष्णू भागवत, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रोहित यमुल, बाळासाहेब खेडकर, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.


