Stray Animals : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

पालिकेची ही निष्क्रियता आता नागरिकांच्या जीवावर उठली

0
Stray Animals : मोकाट जनावरांच्या धडकीत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
Stray Animals : मोकाट जनावरांच्या धडकीत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

Stray Animals : पाथर्डी : शहरातील आठवडे बाजार नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी (Stray Animals), असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. बुधवारी (ता. २२) भरलेल्या आठवडे बाजारात (Weekly Market) मोकाट जनावरांच्या धडकेत एका महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी (Injured) झाले. श्रेया गोकुळ सोनटक्के असे जखमी बालिकेचे नाव असून या घटनेमुळे शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : एसटी कष्टकरी जनसंघाची नवी कार्यकारिणी जाहीर

मोकाट जनावरांचीच संख्या अधिक

बाजार परिसरात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा माल जनावरांकडून अक्षरशः फस्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत भाजीपाला लुटला जात असतानाही विरोध केल्यास जनावरे हल्ला करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

थोडक्यात वाचला जीव (Stray Animals)

फक्त आठवडे बाजारच नव्हे, तर शहर व उपनगरातही मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठवड्यात वामन भाऊ नगर परिसरातही अशाच प्रकारात एका लहान मुलीचा जीव थोडक्यात वाचला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पालिका प्रशासनाला देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शहरालगत राहणाऱ्या काही शेतकऱ्यांकडून जनावरे मोकाट सोडली जात असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. जनावरांची संख्या हजारोंच्या घरात गेल्याने अपघात, जखमी होणे आणि मालमत्तेचे नुकसान हे आता नित्याचेच झाले आहे.

कोणतीही मूलभूत सुविधा पुरवली जात नाही

याहूनही गंभीर बाब म्हणजे आठवडे बाजारात पालिकेकडून शेतकरी व व्यापाऱ्यांकडून दररोज ५० रुपयांचा ‘पठाणी कर’ वसूल केला जातो; मात्र, त्या बदल्यात कोणतीही मूलभूत सुविधा पुरवली जात नाही. ना सुरक्षा, ना स्वच्छता, ना नियोजन यामुळे कराचा उपयोग नेमका कुणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, स्वर्गीय वसंतराव नाईक चौक ते हिंद वस्तीगृह माणिकदौंडी चौक या मार्गावर बाजार भरत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. या परिसरात शाळा व रुग्णालय असल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. 

प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी

आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पालिकेची ही निष्क्रियता आता नागरिकांच्या जीवावर उठली असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बाजाराचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.