ST Workers’ Union : पाथर्डी : एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या (ST Workers’ Union) पाथर्डी आगाराची सन २०२६-२७ या वर्षासाठीची नवी कार्यकारिणी जाहीर (Executive Committee Announced) करण्यात आली. आगारात (Depot) झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी बाबासाहेब विनायक गायकवाड, तर सचिवपदी सुभाष खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.याशिवाय कार्याध्यक्षपदी शिवाजी खेडकर, उपाध्यक्षपदी किरण गारुडकर, सहसचिवपदी संतोष बर्डे यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
नक्की वाचा : सरस्वती नदीचे प्रदूषण रोखा; श्रीगोंदा नगरपालिकेला आदेश

दत्तात्रय खेडकर म्हणाले की
एसटी कष्टकरी जनसंघाचे संस्थापक ॲड. गुणरत्न सदावर्ते व अध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या बैठकीत एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर हे मार्गदर्शन करताना म्हणाले, एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून लाखो कुटुंबांचा आधार आहे. मात्र, आज एसटी कर्मचाऱ्यांना वेतन, सेवा अटी, निवृत्तीवेतन आणि आर्थिक स्थैर्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची भूमिका अधिक आक्रमक व संघटित असणे गरजेचे आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एसटी वाचली तरच कामगार वाचतील (ST Workers’ Union)
नवीन कार्यकारिणीने केवळ पदांपुरते मर्यादित न राहता, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे. एसटी वाचली तरच कामगार वाचतील, आणि कामगार वाचले तरच ही सेवा टिकेल. आता संघर्षाची दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. कर्मचारी एकत्र आले, तर कोणतीही लढाई जिंकता येते. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र कराअसा विश्वासही व्यक्त केला. ही बैठक जनसंघाचे राज्य सहचिटणीस सुभाष खेडकर, विभागीय अध्यक्ष अनिल जाधव, विभागीय सचिव परमेश्वर खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
सकारात्मक भूमिका ठेवून काम करू
येणाऱ्या काळात ही कार्यकारिणी एकजुटीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत न्याय मिळवून देईल त्यासाठी आम्ही कायम सकारात्मक भूमिका ठेवून काम करू असा विश्वास यावेळी नूतन अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड,सचिव सुभाष खेडकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नारायण डोळे, प्रशांत रोडी, देवदत्त अंदुरे, सतीश कटारे, महादेव बाबर, सुनील कर्नावट, विजय पारेकर, बाळासाहेब राठोड, सचिन खंडागळे, सतीश बाबर, भाऊसाहेब गीते, विजय बागडे, शिवाजी शिरसाठ, बबन लोणारे आदींसह अनेक पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



