Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा : शहर हद्दीतील सरस्वती नदीमध्ये (Saraswati River) कचरा आणि सांडपाणी टाकून होणाऱ्या प्रदूषणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) गंभीर दखल घेत प्रदूषण तत्काळ रोखून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे कडक आदेश मंडळाने श्रीगोंदा नगरपालिकेला (Shrigonda Municipal Council) दिले आहेत.
नक्की वाचा : पाथर्डीत तिसऱ्या दिवशीही शासकीय कर्मचाऱ्यांचा संप कायम; कामकाज ठप्प
नदी प्रदूषणाबाबत तक्रार
श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश बोरुडे यांनी १५ एप्रिलला नदी प्रदूषणाबाबत तक्रार केली होती. नदीची अवस्था न सुधारल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप-प्रादेशिक कार्यालयाने (अहिल्यानगर) नगरपालिकेला पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कचरा संकलनाची योग्य व्यवस्था करावी (Shrigonda Municipal Council)
या पत्रात नदीपात्रात सांडपाणी सोडणे आणि प्लास्टिकयुक्त कचरा टाकणे बेकायदेशीर असून ते त्वरित थांबवावे. नगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलनाची आणि विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करावी. नदीपात्रात कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदाराला व मंडळाला सादर करावा असे सांगण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले असून, आता मंडळाच्या आदेशानंतर नगरपालिका काय पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



