Young Man Attacked with a Weapon : नगर : अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका परिसरात जुन्या वादातून एका तरूणावर धारदार शस्त्र हल्ला (Young Man Attacked with a Weapon) केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत (Assault) महेश अशोक चव्हाण (वय ३६, रा. लक्ष्मी कारंजा, चितळे रस्ता) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे
स्वप्नील राजेंद्र दातरंगे (रा. दातरंगे मळा), राजेंद्र पांडुरंग कोंडके (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. १७ एप्रिल रोजी रात्री १:३० ते १:४५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हातावर चाकूने वार (Young Man Attacked with a Weapon)
महेश चव्हाण हे मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना शेळके हॉटेलसमोर स्वप्नील दातरंगे याने त्यांना अडवले. ‘मी नालेगावचा दादा आहे’ असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्याचवेळी तेथे आलेल्या राजेंद्र कोंडके याने महेश यांच्या हातावर चाकूने वार केला. स्वप्नीलने महेश यांना घट्ट पकडून ठेवले, तर राजेंद्रने हॉकीस्टिकच्या दांडक्याने हातापायावर मारहाण केली. तुला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.



