Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

0
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

नगर : उन्हाळ्यात कडक उष्णतेमुळे (Intense heat) त्वचेचे टॅनिंग, कोरडेपणा, पुरळ आणि आग होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण उन्हाळयात त्वचेची काळजी घेण्यासाठी काय टिप्स (Summer Skin Care Tips) वापराव्यात हे जाणून घेऊ…

नक्की वाचा: सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटाचा घेर वाढलाय? ‘हे’ उपाय करा,आई झाल्यानंतरही दिसाल फिट…

१. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी फेस वॉश (Summer Skin Care Tips)

– उन्हाळ्यात तेलकट त्वचा ही अधिक तेलकट होऊ शकते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असा फेस वॉश वापरा, जो त्वचेची खोलवर स्वच्छता करून सर्व धूळ आणि घाण काढून टाकेल. कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींना फेस वॉशचा फेस तयार न करणाऱ्या क्लिन्झरची गरज असते.  

२. अँटिऑक्सिडंट्स समावेश करा – तुमच्या उन्हाळ्यातील दिनचर्येत एका चांगल्या अँटिऑक्सिडंट सीरमचा समावेश करा. हे सीरम तुमच्या त्वचेला आर्द्रता देण्यासाठी खूप चांगलं काम करतं. याशिवाय, ते तुमच्या त्वचेला पर्यावरणीय नुकसानीपासून वाचवतात, कोलेजन वाढवण्यास मदत करतात आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात. आणि जर तुम्हाला या सिरमचा वापर करायचा नसेल  तर  तुम्ही लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टी इत्यादींचा आहारात समावेश करू शकता.

३. सनस्क्रीन लावा – सूर्याची UV-A आणि UV-B किरणे खूप तीव्र असू शकतात. त्यामुळे त्वचेवर टॅन येण्याव्यतिरिक्त, अकाली वृद्धत्व, वयानुसार येणारे डाग, बारीक रेषा आणि सुरकुत्या येऊ शकतात. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये सर्व प्रकारच्या त्वचेसाठी SPF 30-50 असलेले चांगले सनस्क्रीन वापरणे गरजेचं आहे. जरी तुम्ही बहुतेक वेळ घरातच राहत असाल तरीही उन्हाळ्यात सनस्क्रीनलावणं मस्ट आहे.

अवश्य वाचा: आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे

४. जास्त मेकअप करणे टाळा (Summer Skin Care Tips)

– उन्हाळ्यात जास्त मेकअप जर आपण केला तर आपल्या त्वचेला श्वास घेता येत नाही. आर्द्रता आणि उष्णता यांचाही त्वचेच्या श्वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जर तुम्हाला थोडा मेकअप करायचाच असेल, तर जास्त फाउंडेशन आणि इतर सौंदर्यप्रसाधनांऐवजी तुम्ही टिंटेड लिप बाम आणि टिंटेड मॉइश्चरायझर वापरण्याचा विचार करू शकता.

५. सनग्लासेस: डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्यामुळे उन्हाळ्यात तिच्या संरक्षणासाठी यूव्ही (UV) प्रोटेक्टेड चष्मा वापरा.

६. जास्त पाणी आणि फळांचे रस प्या –  उन्हाळ्यात तुम्ही दिवसाला किमान २-३ लिटर पाणी प्यायला पाहिजे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत होते. तसेच नारळाचे पाणी, टरबूज आणि ताज्या फळांचा रस देखील तुम्ही उन्हाळ्यात सेवन करू शकता. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवता येते.उन्हाळयात तुमच्या आहारात दही आणि ताकाचा सुद्धा समावेश करा. त्यामुळे तुमची स्किन ही अजून तुकतुकीत दिसू शकते.

७. हवा खेळती राहणारे कपडे घाला – उन्हाळ्यात घालण्यासाठी सुती कापड हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे हलके आणि सैल कपडे घाला. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले घट्ट कपडे घालणे टाळा. यामुळे तुमची अस्वस्थता वाढू शकते आणि तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते आणि जंतुसंसर्ग होऊ शकतो.

७.  दिवसातून दोनदा अंघोळ करा – उन्हाळयात आपण बऱ्याचदा कामासाठी बाहेर पडत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची चांगली स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसातून दोनदा अंघोळ केली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केल्याने दिवसभरात शरीरावर साचलेली धूळ, घाण आणि घाम काढून टाकण्यास मदत होते आणि पुरळ येणे टाळता येते.