Drain Cleaning : प्रवाह अडवणारे अडथळे हटवा; नालेसफाईत त्रुटींवर स्थायी समितीचे बोट

Drain Cleaning : प्रवाह अडवणारे अडथळे हटवा; नालेसफाईत त्रुटींवर स्थायी समितीचे बोट

0
Drain Cleaning : प्रवाह अडवणारे अडथळे हटवा; नालेसफाईत त्रुटींवर स्थायी समितीचे बोट
Drain Cleaning : प्रवाह अडवणारे अडथळे हटवा; नालेसफाईत त्रुटींवर स्थायी समितीचे बोट

Drain Cleaning : नगर: अहिल्यानगर शहरात महापालिकेमार्फत (AMC) सुरू असलेल्या नालेसफाईच्या (Drain Cleaning) कामांवर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अनेक ठिकाणी ओढे व नाले अडथळ्यांमुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले असून, सर्वप्रथम त्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यावर भर द्यावा, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे (Nikhil Ware) यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. या मागणीला सभापती सुभाष लोंढे (Subhash Londhe) यांनी पाठिंबा देत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

बैठकीत एकूण १२ विषयांना मंजुरी

महापालिकेत पार पडलेल्या या बैठकीत सभापती लोंढे, अतिरिक्त आयुक्त, विविध विभागप्रमुख आणि समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत एकूण १२ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बिशप लॉइड कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे विकासकाम, मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौकादरम्यान उड्डाणपुलासाठी भूसंपादन निधीतून रोलिंग करणे, विनायकनगर येथील मातोश्री उद्यानात बहुउद्देशीय सभागृह उभारणे, बोल्हेगावमधील रेणुकानगर येथील बौध्द‌विहाराजवळील मोकळी जागा विकसित करणे, तसेच पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले व नदीपात्र स्वच्छ करावे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नालेसफाई संदर्भात बोलताना वारे मांडली ठाम भूमिका (Drain Cleaning)

. त्यांनी सांगितले की, मंजूर वेळेप्रमाणेच काम पूर्ण व्हावे आणि विशेषतः सावेडी उपनगरात बंद झालेल्या नाल्यांचे प्रवाह तातडीने मोकळे करावेत. तसेच, कोणत्या भागात सफाई सुरू आहे याची माहिती संबंधित नगरसेवकांना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेकडे ९७ चेंबर कामगार असतानाही बाह्य यंत्रणांवर अवलंबून का राहावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बंद गटारींची झाकणे उघडून संपूर्ण स्वच्छता करावी, अशीही त्यांनी मागणी केली.